ट्रॅक्टर वरून खाली पडुन टायर मध्ये दबुन ७ वर्षीय बालकांचा मुत्यु


पारशिवनी : – पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गवना (गरंडा) रोड येथे आरोपीने ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन ७ वर्षाचा मुलगा दुर्गेश पारधी हा ट्रॅक्टर वरून खाली पडुन टायर मध्ये येवुन त्यांचा डोक्यावर मार लागल्याने घटनास्थळीच त्याचा मुत्यु झाल्याने पारशिवनी पोलीसांनी आरोपी अरूण शिंदेमेश्राम विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.६) मे २०२१ ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास फिर्यादी धनुसकुमार रोहित पारधी वय ३५ वर्ष रा. वाघोडा (विटभट्टा) हा वाघोडा विट भट्टा येथे काम करीत असतांना आरोपी अरूण श्रीपात शिंदेमेश्राम वय २६ वर्ष रा. डोरली हा आपले ताब्यातील ट्रॅक्टर मुंडा क्र. एम एच ४० एल ३००९ ट्रॅक्टर ला पाण्याची टॅंक लावुन फिर्यादी धनुस कुमार रोहित पारधी यांचा मुलगा दुर्गश पारधी वय ७ वर्ष रा. विट भट्टा वाघोडा यास ट्रॅक्टर वर बसवुन पाणी भरण्याकरिता जात असताना आरोपी अरुण श्रीपात शिंदेमेश्राम ट्रॅक्टर चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन फिर्यादी चा मुलगा दुर्गश पारधी हा ट्रॅक्टर वरून खाली पडुन टायर मध्ये येवुन त्यांचा डोक्याला मार लागल्याने घटनास्थळी मृत्यु झाला.

अश्या फिर्यादी धनुसकुमार रोहित पारधी च्या तोंडी रिपोर्ट वरून पारशिवनी पोली सांनी आरोपी अरूण श्रीपात शिंदेमेश्राम याला ताब्या त घेवुन त्याचा विरुद्ध अप क्र. १०३/२०२१ कलम २७९, ३०४ (अ) भादंवि सहकलम १८४ मो.वा.का नुसार गुन्हा दाखल करून पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उप निरिक्षक ज्ञानबा पळनाते करीत आहे.
Source link

Leave a Reply