तरुणाची गळफास लावून आत्महत्याकामठी :-स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महालगाव रहिवासी तरुणाने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या खोलीतील पंख्याला रस्सीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री साडे नऊ दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव विजय खैरकर वय 32 वर्षे रा महालगाव तालुका कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात पुढील उत्तरीय तपासणी साठी नागपूर च्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे
Source link

Leave a Reply