दंदे हॉस्पिटलला ना. गडकरींनी दिले 5 व्हेंटिलेटर


नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या दंदे हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर भेट दिले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी हे व्हेंटिलेटर स्वीकारले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आ. प्रवीण दटके उपस्थित होते.

चेन्नईच्या फिनिक्स सिस्टिम कंपनीला ना. गडकरींनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून 500 व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली आहे.

यापूर्वी ना.गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी, आरेाग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, सिव्हिल सर्जन डॉ. पातुरकर यांच्यासोबत बैठक घेऊन रुग्णालयांना सुरळीत ऑक्सीजन पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘स्पाईस हेल्थ’च्या मालक अवनी सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा करून नागपूरसाठी व्हेंटिलेटर्सची मागणी केली. ना. गडकरी यांच्या विनंतीवरून स्पाईस हेल्थ उद्या 125 व्हेंटिलेटर्स नागपूरला पोहोचते करणार आहेत.
Source link

Leave a Reply