दहावी बारावीच्या विद्यार्थ्यानो मदत शाईन ॲपची मदत घ्या – जिल्हाधिकारी - Expert News

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यानो मदत शाईन ॲपची मदत घ्या – जिल्हाधिकारी


नागपूर: दहावी व बारावीच्या परिक्षा देणाऱ्य विद्यार्थ्यांना परिक्षेविषयक असलेल्या अडचणींचे थेट व तात्काळ निराकरण होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘शाईन ॲप’ ची निर्मीती केली आहे. आज या ॲपचे उदघाटन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप एनआयसीव्दारे विकसीत करण्यात आले आहे.या ॲपची मदत घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

स्टुंडट हेल्पलाईन इन एकझाम students helpline in exams या संकल्पनेतील आद्याक्षरे घेऊन हे ॲप तयार करण्यात आले. शाईन इन एक्झाम या नावाने गुगल ॲपस्टोर वर हे ॲप उपलब्ध आहे.

या ॲपव्दारे येणा-या दहावी व बारावीच्या परिक्षेबाबत असणा-या शंका विद्यार्थी विचारू शकतील.हे ॲप मराठी व इंग्रजी या भाषेमध्ये उपलब्ध आहे. या ॲपमध्ये परीक्षाचे वेळापत्रक, वारंवार विचारले जाणारे प्रश्न महत्वाचे संकेतस्थळ, अद्यावत बातम्या, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना आदींचा समावेश असणार आहे. या ॲपला गुगल ॲपस्टोरमधून डाऊनलोड करता येईल. यासाठी विद्यार्थ्याने त्यांचे नाव मोबाईल नंबर इयत्ता व शाळेचे नाव आदी माहिती ॲपमध्ये भरावयाची आहे.

विद्यार्थ्यांनी एकदा ॲपवरून सर्व सूचना व माहिती वाचून घ्यावी. त्यानंतर अडचण आल्यास ॲपवरूनच तज्ञांव्दारे शंका निरसन करण्यात येईल.



Source link

Leave a Reply

%d bloggers like this: