नागपूरमधील वेल ट्रीट हॉस्पिटलला आग, अनेक रुग्ण जखमी


नागपूर – अमरावती मार्गावरील वाडी नजीकच्या वेल ट्रीट हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आग लागली. हॉस्पिटलमधील एससीमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे ही आग लागली आणि एकच खळबळ उडाली.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. तसेच, या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना तातडीने दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. याचबरोबर, हॉस्पिटमध्ये उपचार घेणाऱ्या ३ ते ४ रुग्णांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सर्व रुग्ण सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 Source link

Leave a Reply