नागलवाडी जंगलात युवकाचा मृतदेह - Expert News

नागलवाडी जंगलात युवकाचा मृतदेह


हत्या की आत्महत्या सर्वत्र चर्चा
झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

वाडी :- डिफेन्स वसाहत रेल्वे लाईन च्या मागच्या भागाला लागून असलेल्या नागलवाडी च्या जंगलात काल शुक्रवारी सकाळी एक तरुण युवक झाडाला लटकलेल्या अवस्थेत वाटसरूंना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार मृतक अमरनगर, निलडोह हिंगणा- एमआयडीसी निवासी आशीष उंमरे वय-२२ वर्ष असून तो टाटा यस व चारचाकी वाहन चालवत होता. गुरुवारी रात्री मृतक नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर बाहेर फिरत असताना त्याच्या भ्रमणध्वनीवर काही साहित्य हैदराबादला घेऊन जाण्याचा फोन आला.त्यामुळे तो चारचाकी वाहन घेऊन निघाला असता घरच्यांनी त्याला जाण्यास मनाई देखील केली .यावर त्याने लवकरच परत येतो असे सांगितले व निघून गेला.

शुक्रवारी सकाळी नागलवाडी च्या जंगलात एका झाडाला तो लटकलेल्या अवस्थेत येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसताच परिसरात चर्चा पसरली.काही जागरूक नागरिकांनी वाडी पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.

इकडे घटनास्थळी नागरिक व नातेवाईकांनी अधिक तपासणी केली असता झाडाला काहीच खरचटलेलं दिसून आले नाही,तर झाडाखालचे गवत सुद्धा सुद्धा जसेच्या तसे आढळून आले,त्याच्या शरीराला या काटेरी झाडाचा एकही ओरपडा दिसला नाही व झाडाचा एक काटा सुद्धा तुटलेला दिसून आला नाही.त्याचा मोबाईल सुद्धा दिसून आला नाही.आत्महत्या सदृश स्थिती दिसून येत नसल्याचे मत परिचितांनी व्यक्त केले त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याचे गूढ निर्माण झाल्याचे दिसून आले.वाडी पोलिसांनी त्याच्या अमरनगर येथील निवासस्थानी जाऊन माहिती घेतली असता काहीच पुरावे मिळत नसल्याचे सांगितले.

वाडी पोलीस पुढील तपास करीत असून ही खून की आत्महत्या याचा उलगडा तपासनातर होईल अशी प्रतिक्रिया वाडी पोलीसानी दिली.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: