नासुप्र येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साजरी


नागपूर : शिक्षणाच्या जोरावर या देशात सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणणारे तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना समान अधिकार मिळवून देणारे आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती आज बुधवार दिनांक १४ एप्रिल रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.

नासुप्रचे महाव्यवस्थापक व नामप्रविप्राच्या नगर रचना विभागाचे सह-संचालक श्री. राजेंद्र लांडे व नासुप्रचे कार्यकारी अधिकारी श्री. ललित राऊत यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री. अविनाश बडगे आणि वरिष्ठ लिपिक श्री. बुरले तसेच ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Source link

Leave a Reply