पकवासा रुग्णालय येथे १३६ खाटांचे कोव्हिड रुग्णालय प्रस्तावित


७ दिवसात कार्यांवित होणार : महापौरांनी केली पाहणी

नागपूर : श्री आयुर्वेद महाविद्यालय व पकवासा समन्वय रुग्णालय येथे १३६ खाटांचे कोव्हिड रुग्णालय उघडण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पाहणी केली. रुग्णालय पुढच्या सात दिवसांमध्ये कार्यान्वित करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.

सध्या नागपूरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधितांना बेडस उपलब्ध होत नाही. महापौरांनी शहरात रुग्णांसाठी अतिरिक्त बेडस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यांनी मानकापुर येथील क्रीडा संकुल मध्ये ५०० बेडस ची व्यवस्था करण्याकरीता मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी आणि जिल्हाधिकारी श्री. रविन्द्र ठाकरे यांच्याशी चर्चा केली.


आपल्या नागरिकांसाठी बेडस उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी भारतीय वैद्यक समन्वय समितीचे ट्रस्टी सोबत चर्चा करुन त्यांना पकवासा रुग्णालय येथे कोव्हिड रुग्णालय सुरु करण्याचे आवाहन केले. त्यांचा आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत समिती ने ओपीडी आणि कॉलेज इमारत वगळून इतर परिसर कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी देण्याची तयारी दर्शविली. महापौरांनी सांगितले की, मनपा डॉक्टरांची व्यवस्था या रुग्णालयासाठी करेल.


महापौरांच्या समवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन, भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव डॉ.गोविंद उपाध्याय, प्राचार्य डॉ.मोहन येवले, डॉ. जय छांगाणी, डॉ. हर्षा छांगाणी, डॉ. अर्चना दाचेवार, डॉ.मनीषा कोठेकर, उपायुक्त (महसूल) श्री. मिलींद मेश्राम, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, डॉ.विजय जोशी, मनपा चे अधीक्षक अभियंता श्री. अजय पोहेकर, कार्यकारी अभियंता श्रीमती सोनाली चव्हान उपस्थित होते.
Source link

Leave a Reply