परिवहन विभागातर्फे एक रुग्णवाहिका, दोन शववाहिका गांधीबाग झोनला हस्तांतरित


नागपूर : ऑक्सीजनअभावी नागरिकांचा जीव जाऊ नये. रुग्णालयात रुग्णाला ऑक्सीजनसह हलविण्याची तातडीने व्यवस्था करता यावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मनपा परिवहन विभागातर्फे गांधीबाग झोनला एक रुग्णवाहिका हस्तांतरित करण्यात आली. यासोबतच कोव्हिडमुळे मृत पावलेल्यानंतर मृतदेह तातडीने नेता यावे यासाठी दोन शववाहिकाही प्रदान करण्यात आल्या. शहर बस परिवहन सेवेतील मिनी बसला रुग्णवाहिका आणि शववाहिकांमध्ये परिवर्तीत करण्यात आले आहे.

महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके, माजी परिवहन समिती सभापती तथा परिवहन ,समिती सदस्य बंटी कुकडे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, सहायक आयुक्त अशोक पाटील, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यावेळी उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी रुग्णवाहिका आणि शववाहिकांची पाहणी करून त्यामधील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. ही दोन्ही वाहने गांधीबाग झोन कार्यालयात राहतील व आवश्यकतेनुसार नागरिकांना उपलब्ध होतील, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.
Source link

Leave a Reply