पांडे ले-आऊटमध्ये लसीकरणाला उत्तम प्रतिसाद


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन येथील आयुर्वेदिक दवाखाना पांडे ले-आऊट येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या केन्द्रावर लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती पल्लवी शामकुळे यांच्या प्रयत्नाने ६००० च्या जवळपास ४५ वर्षे वरील वयोगटाच्या नागरिकांनी लस घेतली आहे.

श्रीमती शामकुळे यांनी सांगितले की, पांडे ले-आऊट, जयताळा आणि सोमलवाडा येथे लसीकरण केन्द्र मनपा मार्फत सुरु करण्यात आले आहे. तिन्ही केन्द्रांमध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पांडे ले-आऊट मध्ये सर्वात जास्त प्रतिसाद भेटत आहे. येथे डॉ. सरोज कुथे यांच्या मार्गदर्शनात अश्विन आकरे आणि राकेश मडामे लसीकरण मोहिमेला सहकार्य करीत आहेत. झोनल आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री चन्ने यांच्या नेतृत्वात झोनमध्ये लसीकरण मोहिम राबविली जात आहे.

श्रीमती शामकुळे यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना केन्द्र शासनाच्या नियमानुसार मोठया प्रमाणात लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की कोरोनावर विजय प्राप्त करण्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.




Source link

Leave a Reply