कोरोना बाधितांसाठी रुग्णालय सुरु
नागपूर: नागपूर महानगरपालिके तर्फे पाचपावली सूतिका गृह परिसरामध्ये ११० खाटांचे कोव्हिड रुग्णालय (DCHC) मंगळवारी (११ मे) ला सुरु करण्यात आले. सर्व खाटांसाठी ऑक्सीजन ची सुविधा करण्यात आली आहे. मनपा तर्फे हया रुग्णालयासाठी लिक्विड ऑक्सीजन टँक सुध्दा लावण्यात आले आहे. कोव्हिड रुग्णांसाठी लिक्विड ऑक्सीजन टँकची व्यवस्था करण्यात आलेले हे मनपाचे पहिले रुग्णालय आहे.
यावेळी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त (महसूल) श्री. मिलींद मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर, आसीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. गणेश राठोड व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता खंडाईत यांनी व्यवस्थेची पाहणी केली. महापौर म्हणाले की मनपा आता ऑक्सीजनचा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येथे आता ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठयासाठी धावपळ होणार नाही. त्यांनी मनपा प्रशासनाचे यासाठी अभिनंदन केले.
आसरा फाउंडेशच्या आसरा चॅरीटेबल मल्टी स्पेशिलिटी क्लीनिक, शांतिनगर संस्थे मार्फत या रुग्णालयाच्या संचालनात मदत होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अवेज हसन यांनी मनपा ला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. म.न.पा.तर्फे या ठिकाणी स्पेशालीस्ट डॉक्टर्स, एम.बी.बी.एस.डॉक्टर्स, आयुष डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ इत्यादी नेमण्यात आले आहे.
Source link