फडणवीस यांनी केली आयुष रुग्णालय, पाचपावली डी.सी.एच.सी ची पाहणी


नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेता श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर महानगरपालिकेतर्फे कोरोनाबाधित रुग्णांसाठी संचालित आयुष रुग्णालय, सदर आणि पाचपावलीच्या डेडीकेटड कोव्हिड हेल्थ केयर (DCHC) केन्द्रांची पाहणी केली. त्यांचे सोबत महापौर श्री. दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे आणि स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर होते. श्री. फडणवीस यांनी कोरोनाचा संकटकाळात बाधितांचे उपचार करण्यासाठी मनपाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम आयुष रुग्णालय सदर येथे पाहणी केली. डॉ.खंडागळे आणि डॉ.निर्भय यांनी त्यांना सांगितले की ४० खाटांचे रुग्णालयात सध्या ऑक्सीजनची सुविधा मनपातर्फे करुन देण्यात आली आहे. येथे उपचारासाठी भरती रुग्णांना जेवण, औषधी, इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत अनेक रुग्ण येथून घरी सुखरुप परतले आहे. गंभीर प्रकारच्या कोरोना बाधितांना शासकीय रुग्णालयमध्ये पाठविले जाते.

यानंतर श्री. फडणवीस यांनी पाचपावलीच्या डी.सी.एच.सी.केन्द्राला भेट दिली. या रुग्णालयामध्ये सुध्दा ऑक्सीजन बेडस ची व्यवस्था कोव्हिड रुग्णांसाठी करण्यात आली आहे. मेडिकल सर्व्हिस सोसायटी आणि जमात ए इस्लामी स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. श्री. फडणवीस यांनी कोरोना बाधितांचे उपचार करण्यासाठी मनपाव्दारा केल्या जाणा-या प्रयत्नांची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की रुग्णांसाठी सर्वोपरि प्रयत्न करुन त्यांचा जीव वाचविणे महत्वाचे आहे. यासाठी मनपाला सहकार्य करण्यात येईल. या केन्द्रात मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भोयर व स्वयंसेवी संस्थाचे डॉ. अनवर सिध्दीकी सेवा देत आहेत.


महापौरांनी त्यांना बेडसची उपलब्धता, ऑक्सीजन सिलेंडरची कमतरता, रेमडीसीवर इंजेक्शनची अनुपब्लधतेबद्दल माहिती दिली. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्री. राजेन्द्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनिल अग्रवाल, धरमपेठ झोन सभापती श्री. सुनिल हिरणवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ‍विजय जोशी, डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.
Source link

Leave a Reply