बसपा ने संभाजी जयंती साजरी केली - Expert News
Nagpur

बसपा ने संभाजी जयंती साजरी केली

बसपा ने संभाजी जयंती साजरी केली
Written by Expert News

संभाजी राजे यांच्या 364 व्या जयंती निमित्त बहुजन समाज पार्टीने त्यांचा मानवतावादी वारसा चालविण्याचे आवाहन केले.

आज दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील संभाजी नगरच्या संभाजी चौकात असलेल्या *राजे छत्रपती संभाजी महाराज* यांच्या पुतळ्याला मा प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महिला नेत्या सुनंदाताई नितनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे छत्रपती संभाजी यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले

संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी यांचे चिरंजीव/मुलगा असून त्यांचा जन्म 14 मे 1657 ला पुरंदर किल्ल्यावर झाला. ते अत्यंत विद्वान होते. संभाजींना मराठी सहित संस्कृत, उर्दू, इंग्रजी, फारशी, हिंदी, कानडी, भोजपुरी अशा विविध भाषांचे ज्ञान होते. *संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला*. त्यांनी नायीकाभेद, नकशिख, सातसतक आदि धर्म, राजनीती, कौशल्य, इतिहास अशी ग्रंथ निर्मिती केली. छत्रपती संभाजी हे शिवाजींच्या पुढचे एक पाऊल लढवय्ये होते. त्यांच्या चेहऱ्यात व कर्तृत्वात इतके साम्य आहे की बरेचदा सर्व सामान्यांना संभाजी व शिवाजी ओळखणे कठीण होते.

या अभिवादन प्रसंगी बसपा जिल्हा सचिव अभिलेश वाहने, दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष सदानंद जामगडे, मध्य नागपूर विधानसभा अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूर प्रभारी शंकर थुल, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, नवनीत धडाडे, सागर वराडे, जितेंद्र पाटील, विलास मून, चंद्रमणी गणवीर, शिवपाल नितनवरे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी संभाजी आपका स्वराज अधुरा बीएसपी करेगी पुरा आदी घोषणा देण्यात आल्या.



Source link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: