बसपा : महात्मा फुले जयंती संपन्न


सामाजिक क्रांतीचे जनक, बाबासाहेबांचे गुरु, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ह्यांची आज १९४ वी जयंती नागपूर बसपा तर्फे संपन्न झाली*. महाराष्ट्र प्रदेश बसपा चे कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम ह्यांच्या नेतृत्वात आज महात्मा फुले मार्केट परिसरातील फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, जिल्हा सचिव अभिलेश वाहणे, सागर लोखंडे, माजी पक्षनेता गौतम पाटील, दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष सदानंद जामगडे, उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष राजेश खांडेकर, पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष मनोज निकाळजे, मध्य नागपूर विधानसभा अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, योगेश लांजेवार, प्रकाश फुले, विलास पाटील, शंकर थुल, बुद्धम राऊत, इंजी. राजीव भांगे, सुबोध साखरे, सुरेंद्रपाल सिंग, सादाब खान, विवेक सांगोळे, अशोक मंडपे, परेश जामगडे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

आज शासनातर्फे कडक लॉकडाउन घोषीत असल्याने शासकीय नियमांचे पालन करीत बसपा नेते, पदाधिकारी व हितचिंतक आपल्या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आज एकत्र आले होते. यावेळी बसपा नेत्यांनी फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळावे याची मागणी सुद्धा केली.

उत्तम शेवडे कार्यालयीन सचिव महाराष्ट्र प्रदेश बसपा




Source link

Leave a Reply