बुधवारी २४ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. ५ मे) रोजी २४ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,३९,००० चा दंड वसूल केला. पथकाने ६० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

कोव्हिड – १९ चे आदेशाचे उल्लंघन करणा-या सतरंजीपूरा झोन अंतर्गत एकूण ५ दुकाने सील करण्यात आली. यामध्ये होल्लाराम फत्तेचंद जनरल स्टेशनरी, अब्दुल खुर्शिद तहरीक प्लास्टीक, राम ट्रेडींग कंपनी, राधे एन्टरप्राईजेस सर्व बोहरा मस्जिदजवळील दुकाने असून बर्तन ओळी इतवारी येथील आशीष घाटोळे यांचे रांगोळीचे दुकानाचा समावेश आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Source link

Leave a Reply