बेला येथे कोविड केअर सेंटरची मागील


साडेतीनशे सक्रिय रुग्ण

बेला: प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना चे जवळपास साडेतीनशे सक्रीय रुग्ण मिळाले आहेत याशिवाय दर दिवशी संख्या वाढतच आहेत गंभीर व चिंताजनक रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी येथे आसपास कोठेही कोविड केअर सेंटर नाही पन्नास किलोमीटर दूरवरच्या नागपूर किंवा उमरेडच्या रुग्णालया शिवाय येथे पर्याय नाहीये त्यामुळे कोरोना ग्रस्तांसाठी बेला येथील सुसज्ज सुविधायुक्त कोविंड सेंटर रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाला केली आहेत या संदर्भात अप्पर तहसीलदार अश्विनी नंदेश वरी यांना निवेदन देण्यात आले

बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 20- 25 खेडेगावाचा परिसर येतो तुटपुंजा व्यवस्थेमुळे येथे औषधोपचार मर्यादा येते आज ता गायत अंदाजे 500 कोरोना बाधित रुग्ण येथे निघाले असून त्यातील बहुतांश कोरूना मुक्त झाले आहेत तरी पण अजून साडेतीनशे जण सक्रिय रुग्ण आहे वयोवृद्ध व गरीब रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा यादृष्टीने बेला येथे तातडीने कोविंड केअर सेंटर रूग्णालय सुरू करावे अशी मागणी प. स. सदस्य पुष्कर डांगरे सेवा सह संस्थेचे अध्यक्ष वासुदेव कांबळे उत्तम पराते बापूराव नौकरकर रमेश मेंडूले कोलबा रोडे आधी सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे

लवकरच विलगीकरण कक्ष:
ग्रामीण भाग असल्याने बऱ्याचशा पेशंट कडे घरी कारण टाईन राहण्यासाठी स्वतंत्र खोली नसते त्यामुळे ही गैरसोय लक्षात घेता बेला येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात लवकरच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे तेथे 25 30 खाटांची व ऑक्सिजन सह इतर सुविधा उपलब्ध होत आहेत कोविंड केअर सेंटर च्या मागणीने निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल असे अप्पर तहसीलदार अश्विनी नंदेश्वर यांनी शिष्टमंडळाला यावेळी सांगितले

लसीकरण तातडीने करा:
कोरोनाला रोखण्यासाठी व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्व जनतेनी 18 वर्षावरील कोरोना प्रतिबंधक लस स्वतःला लावून घ्यावी दरसे ज सकाळी9.30 ते 5 वाजेपर्यंत बेला प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण सुरू आहेत 45 वर्षावरील अंदाजे साडेचार हजारावर नागरिकांनी लस घेतली आहेत तरीपण अजून दोन हजार जण राहिले आहेत मनात गैरसमज न ठेवता जनतेनी लस घ्यावी
विकास धोके वैद्यकीय अधिकारी




Source link

Leave a Reply