भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण-पश्चिम मंडळ चे नागपूर पोलीस आयुक्ताना निवेदन


आज नागपूर शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार साहेब यांना भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण-पश्चिम मंडळ च्या वतिने भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोरजी वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितित दक्षिण-पश्चिम भाजयुमो चे मंडळ अध्यक्ष यश सातपुते यांच्या नेतृत्वात , महामंत्री करण यादव , संपर्क प्रमुख आशुतोष भगत, वेदांत जोशी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

काल दिं.०७.०४.२०२१ रोजी C.B.I. कार्यालया समोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्री. वेदप्रकाश आर्य व त्यांच्या कार्यकर्त्यांनी , महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लावलेल्या लॅाकडाउनच्या नियमांचे नियमोल्लंघन करून आंदोलन केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सत्तारूढ पक्षाचा एक घटक आहे व त्यांचेच पदाधिकारी व कार्यकर्ते जर लॅाकडाउनचे नियम पाळत नसतील, तर कठोर नियम व निर्बंध फक्त जनतेसाठी आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो.

करिता आंदोलनात सहभागी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर नियमानुसार कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावे ही मागणी मा. पोलीस आयुक्तांना केली तसेच आयुक्तांनी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
Source link

Leave a Reply