मंगळवारी १५ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २७ एप्रिल) रोजी १५ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,३२,००० चा दंड वसूल केला. जरीपटका जिंजर मॉल येथील रिलायंस स्मार्ट पाईंट पथकाने सील केले. पथकाने ५० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.




Source link

Leave a Reply