मनपा व द.पू.म. रेल्वेचे कोव्हिड रुग्णालय उत्तर नागपूरात


नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि दक्षिण – पूर्व – मध्य रेल्वे संयुक्त रुपाने उत्तर नागपूर येथील रेल्वेच्या मंगल मंडपम कडबी चौक येथे कोव्हिड रुग्णालय सुरु करणार आहे. ८० खाटांचे रुग्णालयामध्ये २० खाटा रेल्वे कर्मचा-यांसाठी आरक्षित ठेवल्या जातील.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मंगल मंडपम ला भेट देवून व्यवस्थेची पाहणी केली. त्यांच्या सोबत मनपाचे उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम उपस्थित होते. महापौरांनी या कोव्हिड रुग्णालयासाठी दक्षिण – पूर्व – मध्य रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक श्री. मनिंदर उप्पल यांचे सोबत चर्चा केली होती.


रेल्वे तर्फे येथे विद्युत व्यवस्था, पाणी, तीन डॉक्टर्स व सहा नर्सेसची व्यवस्था करण्यात येईल. तसेच मनपा तर्फे ऑक्सीजन लाईन, ऑक्सीजन सिलेंडर, औषधी, डॉक्टर्स व नर्सेस ची व्यवस्था करण्यात येणार आहे. जैविक कचरा मनपातर्फे उचलण्यात येईल. दक्षिण – पूर्व – मध्य रेल्वेचे नागपूरात अन्य कोणतेही रुग्णालय नाही. या रुग्णालयामधून गंभीर आजार नसलेले रुग्णांना दिलासा मिळेल. महापौरांनी मनपा प्रशासनाला रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने लवकरात – लवकर व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.
Source link

Leave a Reply