मनपा-ocw चे आंतरजोडणीच्या कामासाठी 12 तासांचे शटडाऊन 1 एप्रिल (गुरुवारी) रोजी - Expert News

मनपा-ocw चे आंतरजोडणीच्या कामासाठी 12 तासांचे शटडाऊन 1 एप्रिल (गुरुवारी) रोजी


धरमपेठ झोनमधील सिविल लाईन भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बाधित


नागपूर: नागपूर महानगर पालिका आणि ocw ह्यांनी सिविल लाईन मुख्य वाहिनीवर आंतर जोडणी करण्यासाठी १२ तासांच्या शटडाऊनची विनंती केली आहे. २४x७ पाणीपुरवठा ह्या कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या या अंतर जोडणी कामाला १२ तासांचा अवधी लागेल. हे काम एप्रिल १, २०२१ (गुरुवारी ) रोजी सकाळी १० वाजेपासून सुरु होईल आणि संध्याकाळी १० वाजेपर्यंत संपेल .

या १२ तास शटडाऊन दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
धरमपेठ झोन: वाकेर्स रोड, उदय नगर, विजय नगर, रवी भवन, आनंद नगर, VCA, रिसर्व बँक ऑफ इंडिया परिसर, विधान भवन, नागपूर महानगर पालिका सिविल लाईन कार्यालय परिसर, मरियम नगर, विदर्भा नाग चाम्बेर्स , किंखेडे ले आउट , पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त निवास , दामोधर ले आउट , करोडपती ले आउट , जीपीओ चौक , गृहमंत्री निवास , राजा राणी चोव्क, AG कार्यालय , जिल्हा न्यायलय , मुंबई उच्च न्यायालय आणि परिसर, हिस्लोप कॉलेज , मुख्यमंत्री निवास, निवासी जिल्हाधिकारी कोलोनी , सिरीया कॉलोनी, मीठा निम दर्गः, इरीगेशन कॉलोनी आणि NDRF कॉलेज परिसर .

शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या पाण्याविषयी माहिती किवा तक्रारीकरिता नागपूर महानगरपालिका- OCW’s Toll Free Number 1800 266 9899 वर संपर्क साधावा .
Source link

Leave a Reply

%d bloggers like this: