नागपूर, : समाजातील रुढी, परंपरा, अंधश्रध्दा व काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नष्ट व्हावी यासाठी समाज सुधारणेची मुहुतुमेढ ज्यांनी रुजविली, असे बाराव्या शतकातील कर्नाटकातील वीरशैव समाजाचे थोर तत्वज्ञ समाज सुधारक महात्मा बसवेश्वर (बसवण्णा) यांचे जयंती निमित्ताने महापौर श्री. दयाशंकर तिवारी व आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी म.न.पा.मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
समाजातल्या प्रत्येक घटकाचा मग तो कोणत्याही जाती, पंथाचा, वर्गाचा, लिंग अथवा परिस्थितीचा असला तरी त्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे यावर महात्मा बसवेश्वरांचा कटाक्ष होता. त्यांचे विचार आजच्या परिस्थितीत देखील प्रासंगिक आहे, अशी भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी व संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन व रवींद्र भेलावे आदी उपस्थित होते.
Source link