मानेवाडा, शांतिनगर दहन घाटावर एल.पी.जी. शव दाहिनी चे काम पूर्ण करा


आरोग्य समिती सभापतीचे निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती श्री. महेश महाजन यांनी शुक्रवारी (७ मे) रोजी शांतिनगर, मोक्षधाम, गंगाबाई, मानेवाडा व अंबाझरी घाटाची पाहणी केली. त्यांच्या सोबत घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

कोरोनामुळे मृत्यू होणा-या ‍व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाच्या सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडे पुरविण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशावरुन प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय इतर व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व घाटांवर ब्रिकेटस सुध्दा नि:शुल्क आहे. श्री महाजन यांनी या संदर्भात दर्शनी भागावर सूचना फलक सर्व घाटांवर लावण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश स्वच्छता विभागाला दिले.

श्री. महाजन यांनी पर्यावरणाला संरक्षित करण्यासाठी एल.पी.जी. शव दाहिनी चे थांबलेले काम सुध्दा सुरु करण्याचे निर्देश दिले. सतरंजीपुरा आणि मानेवाडा मध्ये एल.पी.जी. शव दाहिनी लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम शीघ्र पूर्ण करुन नागरिकांना पर्यावरण पूरक शव दाहिनी उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, विजय हुमने, सुषमा मांडगे व किरण बडगे प्रामुख्याने उपस्थित होते.




Source link

Leave a Reply