मुळक आयुर्वेदिक कॉलेज मध्ये १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय प्रस्तावित


नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधितांना बेडस कमी पडत आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी जास्तीत-जास्त बेडस कसे उपलब्ध करता येईल यासाठी महापौर श्री दयाशंकर तिवारी प्रयत्न करीत आहे. मंगळवारी (२० एप्रिल) रोजी त्यांनी भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक हॉस्पीटल एंड रिचर्स सेंटर के.डी.के.कॉलेज परिसर, नंदनवनचा दौरा केला. त्यांनी या रुग्णालयात १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरु करण्यासाठी ऑक्सीजन लाईन टाकण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

महापौरांनी यापूर्वी श्री आयुर्वेदिक महाविद्यालय व पकवासा समन्वय रुग्णालयाचा दौरा करुन १३६ खाटांचे रुग्णालय उघडण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले होते. महापौरांनी सांगितले की शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयांना कोव्हिड रुग्णांसाठी वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय मध्ये ऑक्सीजनची १०० खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापौरांनी सांगितले की पुढच्या दहा दिवसात ही सगळी व्यवस्था पूर्ण करण्याचे प्रयत्न तज्ञ चिकित्सक, नर्सेस ची व्यवस्था मनपा तर्फे करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनीसुध्दा त्यांचा प्रयत्नाला साथ दिली आहे.

यावेळी महापौरांसोबत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मीना अलनेवार, आर.एम.ओ.डॉ.संगीता भागडकर, समन्वयक डॉ. शरद त्रिपाठी, उपायुक्त (महसूल) श्री. मिलींद मेश्राम, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
Source link

Leave a Reply