रस्त्यावर फिरणा-या कोरोनाबाधितांवर ५ हजाराचा दंड - Expert News

रस्त्यावर फिरणा-या कोरोनाबाधितांवर ५ हजाराचा दंड


मनपा आयुक्तांचा दणका


नागपूर : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १६ मार्च) रोजी गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणा-या एका कोरोना बाधित रुग्णावर रु. ५,००० चा दंड लावला.

आशीनगर झोन अंतर्गत महेन्द्रनगर मध्ये राहणारा हा रुग्ण घराचा बाहेर फिरत होता. मनपा आयुक्तांनी नुकतेच निर्देश दिले होते की गृह विलगीकरणाचे पालन न करणा-या रुग्णांवर दंड वसूल करा तसेच त्यांना विलगीकरण केन्द्रात पाठवा. त्या अनुसार ही कारवाई करण्यात आली.

तसेच पथकाने १२ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,०६,००० चा दंड वसूल केला.पथकाने गती के डब्ल्यू ई एक्सप्रेस लिमिटेड काटोल रोडवर रु २५ हजाराचा दंड लावला. पथकानी ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: