Nagpur

रामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी

रामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी
Written by Expert News

प्रभाग नंबर 17 मध्ये येणाऱ्या रामबाग मध्ये सार्वजनिक शौचालयाची व त्यातही महिला शोचालयाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

बैद्यनाथ चौकातील कामगार भवन मागील वसाहतीत शासनाच्या वतीने सार्वजनिक शौचालय अनेक वर्षापूर्वी बांधलीत. त्यातील महिला शोचालयाचे दरवाजे गायब झाली, त्यामुळे कपडे लावून शूचास बसावे लागते, ही अत्यंत शरमेची बाब असून शौचालयाची संडास सीट सुद्धा तुटलेल्या आहेत. तसेच गटर लाईन विस्कळीत झालेली आहे.

महिलांच्या शौचालयाची खूपच दूर व्यवस्था झाल्याने रामबाग येथील बसपाचे जेष्ट कार्यकर्ते सुरेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वात आज धंतोली च्या सहाय्यक आयुक्त बागडे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात जगदीश गजभिये, आर्यन कांबळे, सुरज पुराणिक, अश्विन सोनटक्के, विनोद इंगळे, शालूताई तागडे, जयाताई ठाकरे व बसपाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.Source link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: