राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त मनपा व्दारा विनम्र अभिवादन


नागपूर : ज्यांनी आपल्या खंजेरी भजन, भाषण आणि ग्रामगीतेसह अन्य साहित्यातून समाजातील अंधश्रध्दा दूर करुन समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला, असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११२ व्या जयंती निमित्त मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

म.न.पा.मुख्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, प्रभारी उपायुक्त महेश धामेचा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी राष्ट्रसंताच्या ग्राम गीता व ग्राम स्वच्छतेचा आवर्जुन उल्लेख केला. कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जग धास्तावले असतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी “माणूस द्या मज माणूस द्या” या भजनाव्दारे दिलेल्या माणूसकीच्या शिकवणीचा अंगिकार प्रत्येकाने करावा व कोरोनाग्रस्तांचे मदतीसाठी पूढे यावे असे आवाहन केले.
Source link

Leave a Reply