वर्धा रेमडीसीविर इंजेवशनचे पाहिले उत्पादन - Expert News
Nagpur

वर्धा रेमडीसीविर इंजेवशनचे पाहिले उत्पादन

वर्धा रेमडीसीविर इंजेवशनचे पाहिले उत्पादन
Written by Expert News

– 17 हजार इंजेक्शन ना. गडकरी यांच्या उपस्थितीत वितरकांच्या सुपूर्द

नागपूर– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीतून निर्माण करण्यात आलेल्या 17 हजार रेमडीसीविर इंजेक्शनचे पाहिले उत्पादन ना. गडकरी यांच्या उपस्थितीत आज वितरकांच्या सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्या मार्फत हे इंजेक्शन नागपूर व महाराष्ट्रात वितरीत केले जातील.

ना. गडकरी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे याना फोन करून रेमडीसीविर इंजेक्शनचा स्टॉक वितरित केल्याबाबतची माहिती दिली. राज्यात आवश्यकतेनुसार या इंजेवशनचे वितरण करण्याची सूचना केली.

ना. गडकरी यांच्या प्रयत्नातून वर्धा येथे 5 मे पासून या इंजेवशनचे उत्पादन सुरू झाले आहे. आतापर्यंत 1 लाख इंजेक्शनचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात हे इंजेवशन पोहोचते केले जाणार आहे

Bold
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दूरध्वनीवरून वर्धेतील जेनेटिक लाईफ सायन्सेस मध्ये रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्धते बद्दल माहिती दिली वराज्यात त्याचे योग्य नियोजन करून वाटप करण्यासंदर्भात चर्चा केली.Source link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: