‘वाटचाल विकासाची’ पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


भंडारा:- महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विकास कामांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘वाटचाल विकासाची महराष्ट्राच्या विकासाची’ या छायाचित्र पुस्तिकेचे 1 मे महाराष्ट्रदिनी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे, आमदार अभिजीत वंजारी, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपनिबंधक मनोज देशकर व अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात शासनाच्या वतीने आयोजित विविध विकास कामे व महत्वाच्या बैठकांची छायाचित्रे या पुस्तिकेत समाविष्ट आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या भंडारा येथील गोसेखूर्द व सामान्य रुग्णालय घटना भेटीची छायाचित्रे या पुस्तिकेत आहेत. त्याचप्रमाणे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम व विविध मंत्र्यांच्या जिल्हा भेटीतील विकास कामे व दौऱ्याचीही छायाचित्रे यात समाविष्ट आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतूक केले.
Source link

Leave a Reply