नागपूर : नागपूर महानगरपालिका तर्फे लक्षण नसलेल्या कोव्हिड रुग्णांचे उपचार करण्यासाठी दोन आणखी कोव्हिड उपचार केन्द्र जनतेच्या सेवेत शनिवार २४ एप्रिल पासून सुरु करण्यात येत आहे. या केन्द्राला धरुन नागपूरात मनपा तर्फे पाच कोव्हिड केन्द्र कार्यरत होतील. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी सहाय्यक आयुक्त व झोनल वैद्यकीय अधिका-यांना कोरोना बाधित रुग्णांना येथे भरती करावयाचे निर्देश दिले आहे. या माध्यमातून कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण करायला मदत मिळेल.
मनपातर्फे शासकीय तंत्रनिकेतन येथे ८० खाटांचे व विधि महाविद्यालय येथे १६० खाटांचे कोव्हिड उपचार केन्द्र सुरु करण्यात येत आहे. या उपचार केन्द्रांवर मनपातर्फे डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील रुग्णांना मनपातर्फे औषधी, जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या नागपूरात आमदार निवास येथे २२५ खाटांचे कोव्हिड उपचार केन्द्र, पाचपावली येथे १५५ खाटांचे कोव्हिड उपचार केन्द्र तसेच व्ही.एन.आई.टी च्या होस्टेलमध्ये ८५ खाटांचे कोव्हिड उपचार केन्द्र कार्यरत आहे. कोरोनाचे पॉझिटिव्ह (लक्षणे नसलेल्या) रुग्णांना येथे दाखल करण्यात येत आहे. त्यांच्या उपचाराची उत्तम व्यवस्था येथे करण्यात आली आहे. जर रुग्णांची प्रकृति बिघडली तर त्याला मनपाच्या रुग्णवाहिकेव्दारे रुग्णालयात दाखल केल्या जाते. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी कोरोना बाधितांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
Source link