‘सर्वांची साथ तर कोरोनावर मात’:-एसडीओ श्याम मंदनूरकर - Expert News

‘सर्वांची साथ तर कोरोनावर मात’:-एसडीओ श्याम मंदनूरकर


कामठी :-कामठी तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या ही वाढीवर असून काल 17 मार्च ला एकाच दिवशी 114 रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह आढळले जे की चिंतनीय बाब आहे.ही धोक्याची घंटा गृहीत धरून नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

नागरिकांनी मास्क चा वापर, सुरक्षित अंतराचे पालन व वारंवार हात धुणे या कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यास नागरिकांना परावृत्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा सहभाग महत्वाचा आहे.त्यामुळे आता कोरोना विरुद्धच्या लढ्यात “सर्वांची साथ मिळाली तर कोरोणावर सहज मात करता येईल असे मत एसडीओ श्याम मदनूरकर यांनी आज तहसील कार्यालय सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत व्यक्त केले.

माझे कार्यक्षेत्र व माझी जवाबदारी या उपक्रमा अंतर्गत एसडीओ श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सभागृहात विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला.याप्रसंगी तहसीलदार अरविंद हिंगे,कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, मुख्याधिकारी संदीप बोरकर ,तालुका आरोग्य अधिकारी संजय माने आदी उपस्थित होते.

एसडीओ मदनूरकर पुढे म्हणाले की ज्याप्रमाणे आपण रोज कपडे, बूट घालतो त्याप्रमाणे आता मास्कचा वापर हा देखील आपल्या परीधानाचा एक भाग करावा याबाबतचे समुपदेशन नागरिकामध्ये जनप्रतिनिधी द्वारे आवश्यक आहे.प्रशासन कोरोना प्रतिबंधासाठी तपासणी, लसीकरण व जनजागृती या तीन बाबीवर भर देत आहे.

सुपेरस्प्रेडरच्या कोरोना तपासणी आवश्यक असल्याचे सांगून कोरोना तपासणीमुळे लवकर निदान झाल्यास संभाव्य धोका टाळता येईल तसेच कोरोनाचा फैलावंदेखील रोखता येईल.याप्रसंगी कामठी नगर परिषद चे अधिकारी कर्मचारी वर्ग सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी



Source link

Leave a Reply

%d bloggers like this: