सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे,टेस्टिंग व लसीकरणाचे आव्हान बावनकुळेनी केले


पारशिवनी :- : कोरोना वैश्विक महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश महामंत्री , माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आज पारशिवनी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री.राजेंन्द सयाम यांना भेटून तालुक्यातील परिस्थितीचा पुरेपूर विचारपूर्वक आढावा घेतला प्रशासनाने त्वरित करावयाच्या उपाय योजना व दिशानिर्देश केले, या दौऱ्यात पा२शीवनी येथिल महात्मा गांधी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सुरू असलेल्या कोव्हिड चाचणी सेंटरची भेट घेतली व तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे विचारपूस केली.

प्रदेश महामंत्री यांनी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत संवाद साधतांना त्यांना आजच्या दौऱ्याबद्दल आढाव्याची माहिती दिली व सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे,टेस्टिंग व लसीकरणाचे आव्हान केले.

त्यांच्या या दौऱ्यात जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, जि.प सदस्य वेंकटेश कारेमोरे,जयराम मेहरकुळे,कमलाकर मेंघर, अशोक कूथे,राजू कडू, रामभाऊ दिवटे,प्रतीक वैद्य,श्याम भीमटे,लीलाधर बर्वे,रिंकेश चवरे,इरशाद शेख,फजीत सहारे,धर्मेंद्र गणवीर,,सौरभ पोटभरे,आकाश वाढणकर उपस्थित होते.




Source link

Leave a Reply