हिवरा शिवारात कोंबडा लढाई वर पोलीसाची धाड


– कोंबडा जुगार खेळणारे ७ आरोपीना पकडुन ७ लाख ५० हजार ७२० रू चा मुद्देमाल जप्त


कन्हान : – पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत हिवरा (गागनेर) शिवारात कोंबडयाची लढाई करून जुगार खेळणा-या स्थळी कन्हान पोलीसांनी धाड टाकुन ७ आरोपीना पकडुन त्याच्या ताब्यातील ७ लाख ५० हजार ७२० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कार्यवाई करण्यात आली.

कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की हिवरा (गागनेर) शिवारात काही लोक कोंबड्यांची लढाई लावुन पैशांचा जुगार खेळत आहेत. या विश्वनिय माहितीवरून मा. परिवेक्षाधिन पोलीस उप विभागीय अधिकारी पोस्टे कन्हान श्री सुजित कुमार क्षिरसागर यांचे मार्गदर्शनात सपोनि अमित कुमार आत्राम, सपोनि सतिश मेश्राम ताफ्या सह रविवारी घटनास्थळी धाड टाकुन काही लोकांना कोंबड्यांची लढाई लावुन पैशांचा हारजीत चा जुगार खेळताना पोलीसांनी रंगेहात पकडुन सपोनि अमित कुमार आत्राम यांचे फिर्यादी वरून आरोपी विरूध्द अप. क्र. १०४/२१ कलम १२ महाराष्ट्र जुगार कायद्या न्वये गुन्हा नोंद करून घटना स्थळावरून दोन पंचा समक्ष सात आरोपींच्या ताब्यातील

१) मारोती ओमनी एम एच ४० के आर – २९२० किंमत २,५०,००० रू.
२) हिरोहोंडा स्प्लेंडर एम एच ४० एम- ८६६८ किंमत ६०,००० रू ३) काळे रंगाची हिरो सिटी एम एच ४० बीके ७४३५ किंमत ६०,००० रू.
४) हिरो स्प्लेंडर एम एच ४० ए इ ४९- ४९७३ किंम त ६०,००० रु. ५) टी व्ही एस ज्युपिटर मोपेड एम एच ४० बीपी ९५७९ किं. ७०,००० रुपये
६) हिरो पॅशन प्रो एम एच ४० ए एच- २८८६ किमत ६०,००० रू ७) लाल रंगाची हिरो पॅशन प्लस एम एस ३१ के आर ३२८९ किंमत ६०,००० रु
८) हिरो स्प्लेंडर एम एच ४० बी डब्ल्यु ३८१५ किमत ७०,००० रू, दोन कोंबडयाचा त्याच ठिकाणी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे लिलाव केला.
आरोपी
(१) अक्षय प्रकाश खंडाईत वय २१ वर्ष जवळील शंभर रुपये, १ मोबाईल किंमत १५ हजार रू,
२) रोशन प्रभाकर अलो णे वय ३० वर्ष चे शंभर रुपये, मोबाईल किंमत १४ हजार रू. दोघे रा. हिवरा (गागनेर)
३) ईश्वर लक्ष्मण भागलकर वय ५० वर्ष, रा. कोराड ता मौदा. जवळुन दोनशे रू, एक मोबाईल किं.१२ हजार रू
४) मनोहर गोपाल चकोले वय ६५ वर्ष रा. निलज त्याचे जवळील सोळाशे रू. एक मोबाईल,
५) अजय सूर्यप्रकाश इंगळे वय १८ वर्ष रा तारसा फाटा त्यांचे कडुन १२९ रू एक मोबाईल किंमत ५ हजार रू,
६) अनमोल अशोक ढोके ३४ वर्ष,
७) अशोक गणपत ढोके वय ६५ वर्षे दो़घेही रा. निमखेडा त्यांचे कडुन १ मोबाईल किंमत सोळाशे रूपये असा एकुण ७ लाख ५० हजार ७२० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.

ही कार्यवाही नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस उपअधिक्षक राहुल माकणीकर, पोली स उपविभागीय अधिकारी कामठी मुख्तार बागवान, परिवेक्षाधिन पोलीस उपविभागीय अधिकारी पोस्टे कन्हानचे सुजित कुमार क्षिरसागर यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलिस स्टेशनचे सपोनि अमितकुमार आत्राम, सपोनि सतीश मेश्राम, नापोशि राजेंद्र गौतम, पोशि सुधीर चव्हाण, संजु बरोदिया, मुकेश वाघाडे, मुकेश जयस्वाल, प्रशांत रंगारी ,शरद गिते सह पोलीस कर्म चा-यांनी कारवाई केली.

– कमलसिंह यादव
Source link

Leave a Reply