होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच धुलीवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

समाजातील कटुता व द्वेषभावना दूर सारून स्नेह व सुसंवादाच्या रंगात रंगण्याचा हा सण आहे. यंदा करोनाचे सावट कायम असल्याने सर्वांनी आपल्या घरीच हा सण साजरा करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन करतो व सर्वांना या पवित्र सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Source link

Leave a Reply