४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे बुधवारी लसीकरण होणार नाही


१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण सुरु राहणार

नागपूर : नागपूर शहरातील लसीकरणासाठी पुरेसा साठा प्राप्त न झाल्यामुळे ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे बुधवारी ५ मे रोजी मनपाच्या स्व.प्रभाकरराव दटके, महाल रोग निदान केन्द्र वगळता इतर केंद्रावर लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

उद्या लस उपलब्ध झाल्या नंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनचा दुसरा डोज दिल्या जाईल. स्व.प्रभाकरराव दटके, महाल रोग निदान केन्द्र येथे कोव्हॅक्सीन दिल्या जाईल.

१८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Source link

Leave a Reply