कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकुड पुरवठा


नागपूर : कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकुड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशान्वये मनपाचे उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांच्यामार्फत सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना यासंबंधी अंमलबजावणीचे पत्र देण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या एकूण १६ दहनघाटांपैकी ६ दहनघाटांवर लाकडांकरिता शुल्क आकारण्यात येत होते. याशिवाय ब्रिकेट्सद्वारे नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाच्या सर्व दहनघाटावर नि:शुल्क लाकुड उपलब्ध करून देण्याबाबत मनपाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या दहन घाटावर कोरोनाबाधित मृतदेहकाचे अंत्यसंस्कारासाठी सध्या लाकडांसाठी शुल्क आकारले जाते त्या घाटावर नि:शुल्क लाकडे पुरविण्यात येतील.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आता सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या दहनघाटांवर कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्काराकरिता पुढील आदेशापर्यंत नि:शुल्क लाकुड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या आदेशाची सर्व झोनस्तरावर अंमलबजावणी करण्यासंदर्भात उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी पत्र निर्गमित केले आहे.
Source link

Leave a Reply