कोरोना बाधितांच्या वार्डात जाण्यास नातेवाईकास प्रतिबंध घाला : महापौर


नागपूर : एकीकडे शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाबाधित उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भर्ती आहेत. कोरोनाबाधितांच्या वार्डात जाण्यात त्यांच्या नातेवाईकांना मनाई आहे. तरीही त्यांचे नातेवाईक नजर चुकवून जबरदस्तीने सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री चहा, नास्ता, जेवण घेऊन त्यांना भेटायला जातात. कोव्हिडच्या मागील साथी मध्ये कोव्हिड वार्डा मध्ये रुग्णालय कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतरांना प्रतिबंधीत करण्यात आलेले होते व त्यानुसार पोलिस प्रशासनाने देखील कठोर निर्बंध लावले होते. सद्यस्थीतीत कोव्हिड वार्डातून निघणारा माणून कोरोना कॅरिअर म्हणून समाजात वावरत आहे, त्यांच्या प्रवेशावर पोलिसांच्या सहकार्याने प्रतिबंध घाला, असे स्पष्ट निर्देश महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.

महापौरांनी सांगितले की, कोव्हिड वार्डात बाधितांच्या नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी देऊ नये. पोलिसांनी नागरिकांना बाहेर थांबवावे आणि जर कोणी जबरदस्ती करत असेल तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. नागपूरला कोरोनापासून मुक्त करायचे असेल तर कडक निर्बंध लावावे लागतील.

खाजगी कोव्हिड उपचार केन्द्राकडून शपथपत्र घ्या.
ज्या हॉटेल व मंगल कार्यालयाला कोव्हिड केअर सेंटरच्या रुपात मान्यता देण्यांत आलेली आहे. त्या सर्वांकडून एक शपथपत्र घेवून कोणत्या दरात नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यांत येईल आणि कोणती सुविधा उपलब्ध करुन देण्यांत येईल, त्याचा ड्राफट तयार करुन याबाबतचे एक शपथपत्र येणा-या २४ तासात सर्व हॉटेल व मंगल कार्यालय यांच्याकडून घेण्यात यावे व त्या कोव्हिड सेंटरच्या दर्शनी भागात त्या रेटचा चार्ट लावुन घेण्यात यावा.

काल एक तक्रार प्राप्त झाली की, कोव्हिड केंयर सेंटरमध्ये रेमडीसीविर२० हजार रुपयामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले. आय.सी.एम.आर.च्या गाईड लाईनप्रमाणे कोव्हिड केअर सेंटरमध्ये रेमडीसीविर देता येवू शकते काय? याची तपासणी करण्यात यावी, जर ही बाब नमुद नसेल तर आम्ही हॉटेल व मंगल कार्यालयांकडून जे शपथपत्र घेणार आहे, त्यात ही बाब नमुद करावी, सर्व बाबी लिखीत स्वरुपात लिहुन घेण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले.
Source link

Leave a Reply