राज्यशास्त्र शिक्षक परिषदेचा हेतू मार्यदित नसून व्यापक आहे- प्रा. पवार

राज्यशास्त्र शिक्षक परिषदेचा हेतू मार्यदित नसून व्यापक आहे- प्रा. पवार


कामठी :राज्यशास्त्र शिक्षक परिषद राज्यशास्त्र विषयापापुरतीच मर्यादित नसून विद्यार्थी व शिक्षक हित जोपासत असताना सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रम राबवत असल्याचे प्रतिपादन राज्यशास्त्र शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा सुमित पवार यांनी प्रतिपादन केले.तसेच त्यांनी परिषदेचा हेतू व भूमिका मांडली.

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेची नागपूर व वर्धा जिल्ह्य कार्यकारिणी सहविचार सभेत प्रा सुमित पवार बोलत होते.

सभेच्या अध्यक्ष स्थानी प्रा सुमित पवार होते.या प्रसंगी
राज्य कार्याध्यक्ष प्रा. भगवान चौधरी सर,सचिव प्रा डॉ पितांबर उरकुडे सर राज्यउपाध्यक्ष व पालक प्रा. श्री शरद जोगी सर , प्रा. नारायणे सर नागपूर,प्रा स्मिता जयकर,प्रा शरद कारामोरे सर, प्रा रविकांत जोशी प्रा बक्षी प्रा डॉ सुधीर अग्रवाल विभागातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्यगन. सहा जिल्याचे अध्यक्ष व महा सचिव यांचीप्रमुख उपस्तिथीत होती.

सभेला संबोधित करताना प्रा सुमित पवार म्हणाले, सातत्य,सहकार्य व संपर्क,परस्पर समन्वय,सूत्रबद्ध कार्याचे नियोजन, लोकशाही मूल्यांना प्राधान्य देऊन परिषद विकसित करू,अशी ग्वाही त्यांनी दिली.बदलत्या अभ्याससक्रमावर त्यांनी भाष्य करत शिक्षकांचे मत जाणून घेतले व याबाबत परिषदेची भूमिका मांडली।शिक्षकांबद्द समाजामध्ये वेगळीच भूमिका निर्माण झाली आहे ही भूमिका बदलून शिक्षकांनी समाज व राष्ट्र निर्माण कार्यात स्वतःला वाहून घेतले पाहिजे,असेही प्रतिसादन त्यांनी केले

याप्रसंगी परिषदेचे राज्यसचिव प्रा डॉ पितांबर उरकुडे यांनी
उपस्थितीबद्दल माहिती देवून प्रत्येकाने संघटनेशी जोडले जावे,असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी स्मिता जयकर मॅडम त्या म्हणाल्या, कुटूंबाप्रमाणे संघटना आहे. एकमेकासोबत सलोख्याचे संबंध आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून संघटनेचं कार्य करावे.

कार्यक्रमाचे संचालन प्रा सावलकर सर यांनी केले तर
आभार प्रदर्शन- प्रा. सौ रूपल वाट मॅडम यांनी केलं.प्रस्तावित प्रा केदार सर यांनी केले.कार्यक्रमाला राज्यशास्त्र परिषदेचे नागपूरजिल्हाचे सचिव प्रा कुंदन तितरमारे व वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा रत्नाकर चोरे,सचिव प्रा साखरकर सर व बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.
– संदीप कांबळे,कामठी





Source link

Leave a Reply