लोकप्रतिनिधीनी लसीकरणाससाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे:-सीईओ


कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनाला लढा देण्यासाठी शासनाच्या वतीने नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे मात्र लसीकरणाबाबत काही नागरिकांमध्ये चुकीचा संभ्रम पसरवण्यात आल्यामुळे बहुधा नागरिक लसीकरनासाठी धजावत येत असल्याचे निदर्शनास येत आहे वास्तविकता प्रशासनाच्या वतीने लावण्यात येत असलेली कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णता सुरक्षित असल्याने नागरिकांनी मोफत मिळत असलेल्या या कोविड प्रतिबंधक लसीकरणा चा लाभ घ्यावा तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा प सदस्यांसह लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून देशलढ्यात सहभाग नोंदवावा असे आव्हान नागपूर जोल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काल 2 एप्रिल ला कामठी तालुक्यातील येरखेडा तसेच खैरी च्या आरोग्य उपकेंद्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात भेट देताप्रसंगी व्यक्त केले.

यात त्यांनी आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची पाहणी करोत आढावा घेतला शिवाय उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याशी संवाद साधला व लसिकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी लसिकरणाचा आढावा सुद्धा घेतला.

त्याचप्रमाणे कामठी पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांना लसीकरण ताबडतोब होणे स्वतः गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच येरखेडा व रनाळा येथील कोविड प्रतिबन्धात्मक क्षेत्राची पाहणी केली. यावेळी उप विभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंशुजा गराटे , सहाय्यक गटविकास अधिकारी गायगोले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय माने , आरोग्य विस्तार अधिकारी दिघाडे इत्यादी सर्व उपस्थित होते.

– संदीप कांबळे,कामठी





Source link

Leave a Reply